उजनी @ 50 टक्के : धरणात येणारा विसर्ग कायम

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणी पातळीने आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महत्वाचा 50 टक्केचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे आता धरण 100 टक्के भरण्याची खात्री तर झालीच आहे,मात्र पूरस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.

गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही उजनी धरण 100 टक्के भरण्याकडे वाटचाल करीत आहे. उणे 24 टक्के वरून सुरू झालेला धरण भरतीचा प्रवास आता 50 टक्केवर येऊन ठेपला आहे. मागील 10 दिवसांत धरणात वेगाने 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.

आज सायंकाळी 7 च्या सुमारास धरणाने 50 टक्केची पातळी ओलांडली आहे. दौंड येथे भीमेला 11 हजार 365 क्यूसेक्स तर बंडगार्डन येथे 13 हजार 116 इतका विसर्ग कायम आहे. त्यामुळे पाऊस थांबला तरीही धरणाच्या पाणी साठ्यातील वाढ कायम आहे. लवकरच धरण 100 टक्केचा टप्पा पार करेल असे चित्र निर्माण झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!