उजनी धरण प्लसच्या उंबरठ्यावर ! @ – 0.98

24 तासात प्लस होण्याची शक्यता : 15 जुलै अखेर धरणावर झाला 298 मिमी पाऊस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा आधारस्तंभ असलेले उजनी धरण येत्या 24 तासात मायनसची पातळी पार करून प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजता उजनी धरणातील पाणीसाठा वजा 0.98 टक्के इतका असून धरणात येणारा विसर्ग 2223 क्यूसेक्स इतका आहे. दरम्यान, उजनी धरणावर बुधवारी 24 तासात 20 मिलिमीटर इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे उजनी धरण येत्या 24 तासात प्लसकडे वाटचाल करणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टर शेती क्षेत्र, तसेच सोलापूर महानगरपालिकेसह प्रमुख शहरांच्या पाणीपुरवठ्याचा स्त्रोत म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ संपवणाऱ्या उजनीच्या पाणी साठ्याकडे त्यामुळेच सबंध जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते.
मागील वर्षी 16 जुलै रोजी उजनी धरण उणे 31 टक्के या पातळीत होते. त्या तुलनेत यंदा उजनी धरणाची पाणी पातळी अतिशय समाधानकारक आहे.

जूनच्या पहिल्या दिवसापासून पुणे जिल्ह्यासह उजनीच्या धरण क्षेत्रातही यंदा तब्बल 293 मिलिमीटर इतका चांगला पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 16 जुलै अखेर धरण क्षेत्रात केवळ 71 मिलिमीटर पाऊस झाला होता. तुलनेत यंदा खूप समाधानकारक पाऊस पडल्यामुळे उजनी धरणाचे पाणी पातळी मायनसमधे जाऊही 15 जुलैपर्यंत प्लसच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.


पावसाळ्याचे आणखी 75 पेक्षा जास्त दिवस शिल्लक आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सरासरी 40 टक्के इतका पाणीसाठा असल्यामुळे येत्या महिनाभरात उजनी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पावसाळ्याचे दिवस शिल्लक राहत असल्यामुळे यंदा सोलापूर जिल्ह्यात पाऊस आणि पाणी याबाबत शेतकरी समाधान असणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!