उजनी @ 94 %

धरणावर झालेल्या पावसाने 2 टक्के ची वाढ : धरण लवकरच शंभरी पार करणार.

टीम : ईगल आय मीडिया

शुक्रवारी (दि.1 ऑक्टोबर रोजी ) रात्री व शनिवारी पहाटे उजनीच्य‍ा धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असुन त्यामुळे 24 तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 2 टक्के ची भर पडली आहे. तसेच उजनी धरणातील पाणीसाठ्याची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.

मागील 8 ते 10 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री मात्र धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रावर मुसळधार प्रमाणात हजेरी लावल्यामुळे शुक्रवार सायं.६ ते आज शनिवार स.६ या १२ तासात उजनी धरणातील पाणीसाठा जवळपास २ टक्‍क्‍यांनी वाढण्यास मदत झाली आहे.

धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात पळसदेव येथील १०० मि.मी, भिगवण येथे ९१ मि.मी तर प्रत्यक्षात धरणावर भिमानगर येथे १२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

तसेच उजनीत दौंड येथून येणारा विसर्ग ३ हजार ९१७ क्युसेक्स एवढा आहे. त्यामुळे आज शनिवार स.६ वा. धरणाची टक्केवारी ९४.३० टक्के एवढी झाली आहे. धरण लवकरच शंभर टक्के होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. आज शनिवार स.६ वा. उजनी धरणाची पाणी पातळी ४९६.५७० मीटर, एकूण पाणीसाठा ३२३३.५६ द.ल.घ.मी (११४.१८) टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा १४३०.७५ द.ल.घ.मी (५०.५२) टीएमसी एवढा झालेला असून धरणाची टक्केवारी ९४.३० टक्के एवढी आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!