उजनीचा विसर्ग पुन्हा वाढवला

दौंड, बंडगार्डन येथील पाण्याची आवक मंदावली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरण अगदी काठोकाठ म्हणजे 110 टक्के भरल्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड आणि बंडगार्डन येथील विसर्ग मोठ्या प्रमाणात मंदावला आहे. तर पाऊस बंद झाल्याने वीर मधून नीरा नदीला सोडण्यात येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी 5 हजार क्यूसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे. दौंड येथे 5 हजार 258 क्यूसेक्स तर बंडगार्डन येथे 7 हजार 821 क्यूसेक्स एवढा विसर्ग उजनीत येत आहे.
दोन्ही कालवे, बोगदा, उपसा सिंचन योजना, वीजनिर्मितीसाठी सुमारे 10 हजार क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे.
यंदाच्या हंगामात 2 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

वीर धरणातील विसर्ग पुन्हा बंद

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 200 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणारा विसर्ग रात्री 12.00 वाजता बंद करण्यात आला आहे . तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!