दौंडजवळ मोठी आवक चालूच
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुणे जिल्ह्यातील धारणातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. आज सकाळी धरणातील पाणी साठ्यात 25 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, दौंडजवळ उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग तब्बल 47 हजार 814 क्यूसेक्स असल्याने दोन दिवसांत धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ होणार असल्याचे निश्चित आहे.
उजनी धरण गुरुवारी उणे पातळीत होते.मात्र मागील तीन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने दोन दिवसात धरणातील पाणी साठ्यात सुमारे 20 टक्केहून अधिक वाढ झाली आहे. आज सायंकाळी 18.32 टक्के या पातळीवर धरण साठा होते. 12 तासात आणखी वाढ होऊन ते आज सकाळी 25. 25 टक्के झाले आहे.
उजनीत येणारी आवक मोठी आहे. दौंड जवळ 47 हजार 817 क्यूसेक्स इतका विसर्ग येत आहे.तर बंडगार्डन येथे 21 हजार 221क्यूसेक्स इतका विसर्ग कायम आहे. त्यामुळे उजनी येत्या आठवड्यात पन्नाशीच्या घरात जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.