उजनीतून 20 हजार क्यूसेक्स पाणी सोडले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 2 दिवसांत झालेल्या पावसामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोमवारी सकाळी 20 हजार क्यूसेक्स ने विसर्ग सोडला आहे. उजनीच्या दोन्ही कालव्यातून 2400 क्यूसेक्स तसेच वीजनिर्मिती साठी 1600 क्यूसेक्स पाणी सोडले जात आहे.

परतीच्या पावसाने पुणे जिल्ह्यात ही दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. उजनीत येणारा विसर्ग दौंड येथे 4500 हजार क्यूसेक्स इतका आहे. उजनी धरणावरही पाऊस पडत असल्याने धरणातून रविवारीच पाणी सोडण्यास सुरुवात केली होती.

सोमवारी सकाळी हा विसर्ग वाढवून 20 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. उजनी धरण 110 टक्के भरले असल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे भीमेच्या पातळीत वाढ होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!