उजनीतून भीमेला 15 हजार क्यूसेक्स विसर्ग

उजनी 111 टक्के भरले : धरणावर रात्रीत 100 मिमी पाऊस

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरण रविवारी रात्री 111 टक्के पेक्षा जास्त भरले असून धरण क्षेत्रात रात्री 100 मिमी एवढा तुफान पाऊस पडला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला15 हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, वीर धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग रविवारी पहाटे 13 हजार 911 करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीला सुमारे 30 हजार पेक्षा जास्त क्यूसेक्स चा विसर्ग राहण्याची शक्यता असून नदी काठच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
उजनी धरण सोमवारी सकाळी 6 वाजता 111.17 टक्के इतके भरले आहे. तर धरणावर 100 मिमी एवढा मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजता उजनीतून 11 दरवाजे उघडून 15 हजार क्यूसेक्स एवढा विसर्ग भीमा नदीला सोडण्यात येत आहे. वीजनिर्मिती चा 1600 क्यूसेक्स विसर्ग नदीला येत असून एकूण 16600 क्यूसेक्स विसर्ग उजनीतून भीमा नदीच्या पात्रात येत आहे. त्यामुळेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

वीर चा विसर्ग वाढवला

वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करुन सोमवारी पहाटे 1.00 वाजता 13 हजार 911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!