उजनी धरणातून भीमेला आज पाणी सोडणार ?

उजनी 104 टक्के : दौंडचा विसर्ग 24 हजार क्यूसेक्स

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरण मंगळवारी सकाळी 8 वाजता 104 टक्के पार झाले असून दौंड येथे उजनीत येणारा विसर्ग 24 हजार क्यूसेक्स इतका आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आज उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्याची शक्यता आहे.

उजनी धरण यंदा सुमारे 1 महिना उशिराने 100 टक्के भरले आहे. सोमवारी दुपारी धरण 100 टक्के भरल्यानंतर भीमा- सिना बोगदा आणि कालव्यास 1700 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र धरणात वरून येणारा विसर्ग मोठा असल्याने धरणाची पाणी पातळी वाढत आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता 104 टक्के इतके धरण भरले आहे. बंडगार्डन येथे येणारा विसर्ग घटला असुन 11 हजार 61 क्यूसेक्स इतका आहे. तर दौंड येथे हाच विसर्ग 24 हजार 525 क्यूसेक्स आहे. त्यामुळे धरण 110 टक्के या पूर्ण क्षमतेने आज रात्री उशिरापर्यंत भरू शकते. हे लक्षात घेऊन आज भीमा नदीला पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!