8 धरणातून विसर्ग चालू : दौंड 35 हजार चा विसर्ग
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील 8 धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणी साठा वेगाने वाढत आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजता 73.78 टक्के झाला होता. सायंकाळी धरणाची पाणी पातळी 74.79 टक्के एवढी झाली आहे.
सकाळपासून सुमारे 70 टक्के असलेली पाणी पातळी दिवसभरात 75 टक्के पर्यँत पोहोचली आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील 8 धरणातून उजनीत पाणी येत आहे.सायंकाळी दौंड चा विसर्ग 35 हजार 463 क्यूसेक्स तर पुणे बंडगार्डन येथील विसर्ग 18 हजार 970 क्यूसेक्स एवढा असल्याने धरणात येणारा विसर्ग कायम आहे..
वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 13 हजार 911 क्यूसेक्स इतका कायम असल्याचे सांगण्यात येते.