उजनी शंभरीच्या उंबरठ्यावर

वीर चा विसर्ग 23 हजार क्यू. : उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची गरज

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्याचे वरदान उजनी धरण आता 100 टक्के भरणे केवळ औपचारिकता उरली आहे. आज रात्री उशिरा धरण 100 टक्केची पातळी गाठण्याची शक्यता आहे. सकाळी 8 वाजता धरण 94 टक्के पार झाले असून बंडगार्डन येथे उजनीत येणारा विसर्ग 24 हजार क्यूसेक्स तर दौंड येथे हाच विसर्ग 11 हजार 786 क्यूसेक्स आहे. त्यामुळे धरण आता शंभरीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
दरम्यान उजनी च्या दोन्ही कालव्यात पाणी सोडून ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातील तळी, तलाव, ओढे, बंधारे, नाले भरून घेण्याची गरज व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरीही गेल्या 15 दिवसात पावसाने उघडीप घेतली आहे. त्यामुळे आता उजनीच्या कालव्यास पाणी सोडण्याची गरज व्यक्त होत आहे.

वीर धरणातील विसर्ग 23 हजार क्यूसेक्स

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 600 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करुन आज सकाळी 8.00 वाजता 23185 Cusecs विसर्ग सुरु करण्यात आला आहे .
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा ईशारा देण्यात आला आहे.

One thought on “उजनी शंभरीच्या उंबरठ्यावर

Leave a Reply

error: Content is protected !!