उजनीची पाणी पातळी 10 टक्के कडे
प्रतिनिधी : इगल आय न्यूज
पुणे जिल्ह्यातून भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी साठ्यात अतिशयव वेगाने वाढ होत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजता उजनी धरणाने ७. ४९ टक्के ची पातळी गाठली असून शुक्रवारी सायंकाळी धरण १० टक्केच्या पुढे जाईल असे दिसत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग तब्बल १ लाख ८० हजार क्युसेक्स वर पोहोचला आहे.
पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाचा फायदा उजनी धरणास होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, वडज, चिल्हेवाडी, कळमोडी,चासकमान, वाडीवाले, कासारसाई, मुळशी या आठ धरणातून विसर्ग सुरु आहे. त्यामुळे दौंड येथे उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग तब्बल १ लाख ८० हजार क्युसेक्स इतका वाढलेला आहे.
याचा परिणाम म्हणूनच शुक्रवारी सकाळी ९ वाजता वजा पातळीमधून प्लस मध्ये आलेल्या उजनी धरणात दुपारी तीन वाजता अधिक ७. ४९ टक्के इतका पाणी साठा झालेलं आहेत. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग १ लाख ८० हजार ७६४ क्युसेक्स इतका झालयामुळे उजनी धरणाची पाणी पातळी केवळ ६ तासात ७.४९ टक्के इतकी वाढली आहे. शुक्रवारी दुपारी उजनी धरणातील पाणी साठा अधिक ७.४९ टक्के इतका झालेला आहे. तर धरणात एकूण ६७. ६७ टक्के पाणी साठा झालेला आहे. उपयुक्त पाणी साठा ४ टीएमसी झालेला आहे.