उजनी : रडत खडत नव्वदी कडे

धरणातील पाण्याची वाढ संथ : 87 टक्के

टीम : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने मागील 8 दिवसांत उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग मंदावला आहे परिणामी 8 दिवसात 7 टक्के पाणी साठा वाढला आहे. कसे तरी रडत खडत उजनी आज सकाळी 7 वाजता धरणामध्ये 86.84 टक्के इतका पाणी साठा झाला आहे.

धरणात येणारा पाण्याचा विसर्ग दौंड येथे 5 हजार 46 क्यूसेक्स तर पुणे बंडगार्डन येथे 7 हजार 775 क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे नव्वदी गाठण्यासाठी आणखी 3 दिवस वाट पाहावी लागेल असे दिसते.

दरम्यान उजनी धरणावरील 14 धरणे 100 टक्के भरली आहेत त्यामुळे पुढच्या काळात धरण 110 टक्के भरण्याची खात्री निर्माण झाली आहे.मात्र तिथंपर्यंतचा प्रवास ही असाच मेटाकुटीला येऊन चालणार की दोन चार दिवसात दणक्यात पूर्ण होणार याची उत्सु5 राहिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!