वीर चा विसर्ग मर्यादित : येणाऱ्या विसर्गात मोठी घट
टीम : ईगल आय मीडिया
गेल्या 4 दिवसांपासून वेगाने सुरू असलेली उजनी धरणाच्या पाणी साठ्यातील वाढ रात्री नंतर मंदावली आहे. आज सकाळी उजनी धरणात 78.59 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. तर दौंड येथील विसर्ग कमी होऊन सकाळी 7 वाजता 13 हजार 409 क्यूसेक्स इतका होता.
पुणे बंडगार्डन येथील विसर्ग ही कमी होऊन 10 हजार 391 क्यूसेक्स इतका चालू आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणावरील पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने उजनीच्या पाणी साठ्यातील वाढ मंदावली आहे.
तर काल सायंकाळी बंद करण्यात आलेला वीर मधील विसर्ग आज मध्यरात्री पुन्हा सुरू केला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज पहाटे 2. वाजता 4637 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी अशी सूचना नीरा उजवा कालवा विभागाने केली आहे. तसेच नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ओके