उजनी धरणाची वाटचाल 80 टक्केच्या दिशेने

वीर चा विसर्ग कमी केला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणाच्या पाणी साठ्यात गेल्या 24 तासात वेगाने वाढ झाली असून आज सकाळी 6 वाजताच धरणातील पाणी साठा 74.38 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग वाढल्याने 24 तासात धरणात 4.38 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, वीर धरणातील विसर्ग आज सकाळी 4637 क्यूसेक्स इतका कमी करण्यात आला आहे.


एकूण पाणीसाठा 103.50 टीमसी झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा 39.85 टीमसी आहे. 74.38% इतका साठा वाढला आहे. उजनीत दौंड येथील विसर्ग कायम असून आज सकाळी 23 हजार 995 क्युसेक तर बंडगार्डन येथे येणारा विसर्ग 18 हजार 970 क्यूसेक्स इतका आहे. उजनीतुन कालवा आणि बोगदा विसर्ग बंद करण्यात आला आहे.


वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणारा विसर्ग सकाळी 7.00 वाजता कमी करून 4637 Cusecs इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!