उजनी सत्तरीच्या उंबरठ्यावर !

उजनीत येणारी पाण्याची आवक वाढली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या महिनाभर साठीच्या आसपास थांबलेला उजनी धरणातील पाणी साठा मागील तीन दिवसांपासून पुन्हा हळूहळू वाढीस लागला आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरण सत्तरी च्या उंबरठ्यावर आले असून 67. 32 टक्के पाणी साठा झालेला आहे. पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग कायम असल्याने उद्या संध्याकाळ पर्यंत धरण सत्तरी पार करेल अशी शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणांत 25 जुलै च्या दरम्यान 62 टक्के इतका पाणी साठा झाला होता.मात्र त्या नंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने धरणातील पाणी साठा 60 टक्के पर्यंत खाली आला होता. पावसाचे प्रमाण कमी सांगण्यात येत होते, त्यामुळे यंदा धरण 100 टक्के कधी भरते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मागील 4 दिवसांपासून भीमा खोऱ्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वरसगाव, चासकमान, कळमोडी, आंध्रा, कासारसाई या धरणांतून सुमारे 10 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणाने पुन्हा सत्तर टक्केच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.

आज ( दि.13 ) सकाळी धरणात 67.32 टक्के पाणी साठा झाला असून बंडगार्डन ( पुणे ) येथे 14 हजार 545 क्यूसेक्स तर दौंड येथे येणारा विसर्ग 11 हजार 786 क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे उद्या सदुपारपर्यंत धरण 70 टक्केच्या पुढे वाटचाल करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. परतीच्या पावसावर आता उर्वरित वाटचाल अवलंबून आहे.

पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे 90 टक्केहून अधिक भरली आहेत, त्यामुळेच चार दिवस पाऊस झाला तरीही उजनी 100 टक्केला जाईल असे मानले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!