टीम : ईगल आय मीडिया
उजनी धरणाच्या पाणी साठ्यात गेल्या 24 तासात वेगाने वाढ झाली असून आज सकाळी 6 वाजताच धरणातील पाणी साठा 70 टक्के पार झाला आहे.
उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे.
दौंड येथील विसर्ग कायम असून आज सकाळी 14 हजार 327 क्युसेक तर बंडगार्डन येथे येणारा विसर्ग 20498 क्यूसेक्स इतका आहे.उजनीतुन कालवा आणि बोगदा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातून येणारा विसर्ग वाढल्याने 24 तासात धरणात 3 टक्के वाढ झाली आहे. एकूण पाणीसाठा 101.38 टीमसी झाला आहे तर उपयुक्त पाणीसाठा 37.72टीमसी आहे. 70.43% इतका साठा वाढला आहे.
आज सकाळी बंडगार्डन येथे असणारा विसर्ग लक्षात घेता उजनीच्या पाणी साठ्यात वाढ कायम राहणार आहे, येत्या 3 दिवसांत धरण 80 टक्केची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.