धरणातील पाण्याची आवक घटली
टीम : ईगल आय मीडिया
पुणे जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली असून दोन दिवसांपासून उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग मंदावला आहे. आज सकाळी 7 वाजता धरणामध्ये 81 टक्के इतका पाणी साठा झाला आहे. दरम्या, वीर धरणातील विसर्ग मर्यादित असून नीरा नदीकाठची पूरस्थिती टाळण्यात आली आहे.
धरणात येणारा पाण्याचा विसर्ग दौंड येथे 7 हजार 516 क्यूसेक्स तर पुणे बंडगार्डन येथे 7 हजार 260 क्यूसेक्स इतका आहे. त्यामुळे आजपासून उजनी तील पाणी साठा वाढ एकदम मंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वीर धरणाच्या सांडव्यातून रात्री 12.00 वाजता 4637 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.