उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ

धरणाचा साठा सत्तरीच्या घरात

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यातील 8 धरणांतून विसर्ग सुरू असल्याने उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होते आहे. उजनी धरण 70 टक्के पर्यंत पोहोचले आहे. बंडगार्डन 28 हजार 456 क्यूसेक्स तर दौंड येथे उजनीत येणारा प्रवाह 29 हजार क्यूसेक्स असल्याने धरण आज 75 टक्के पर्यंत वधारण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यात असलेल्या 19 पैकी 8 धरणांतून शुक्रवारी सुमारे 25 हजार क्यूसेक्स चा विसर्ग चालू आहे, त्यामुळे दौंड येथे धरणात येणारा विसर्ग शुक्रवार पासून वाढला आहे.
पावसाची संततधार कायम असून धरणांची साठवण क्षमता कमी झाल्याने उजनीत पाणी मोठ्या प्रमाणात येऊ शकते. त्यामुळेच येत्या 8 दिवसात धरण 100 टक्के होण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!