नदीकाठच्या लोकांनो सतर्क रहा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी 4 वाजता 30 हजार क्यूसेक्स इतका वाढवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वीजनिर्मिती 1600 असा 31600 क्यूसेक्स इतका विसर्ग भीमा नदीला सोडला जात आहे. त्यामुळे भीमा नदीला पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
दौंड येथे हाच विसर्ग 10 हजार क्यूसेक्स आहे. धरण 110 टक्के भरले असल्याने उजनी धरणात वरून येणाऱ्या विसर्गनुसार पाणी सोडण्याचे प्रमाण कमी अधिक होणार आहे.
रविवारी सकाळी 25 हजार क्यूसेक्स विसर्ग वाढवण्यात आलेला होता. त्यात वाढ करून सायंकाळी 4 वाजता तो 30 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच कालवा, बोगदा, वीजनिर्मिती यासाठीही पाणी सोडले जात आहे.
पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता उजनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असून रविवारी सायंकाळी 4 वाजता 16 दरवाजे उचलून 30 हजार क्यूसेक्स केला आहे.
दरम्यान वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग रविवारी सकाळी 4 हजार 637 क्यूसेक्स केला आहे. त्यामुळे उजनी अधिक वीर चा विसर्ग मिळून भीमा नदीला पंढरपूर तालुक्यातील पाणी पातळी 40 हजार क्यूसेक्स राहण्याची शक्यता आहे.