उपसरपंचपदी उमेश गायकवाड यांची निवड

पंढरपूर : ईगल आय मीडिया
उजनीवसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी मनिषा हरिदास मोरे यांची तर उमेश शामराव गायकवाड यांची एका मताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष पिसे यांनी जाहीर केले.
नुतन सदस्यांची सरपंच, उपसरपंच निवडी साठी आज बैठक घेण्यात आली होती. यावेळी मनिषा मोरे, भगवान सर्जे, आरती गिरि गोसावी, उमेश गायकवाड, सोनाली साखरे, मनिषा कोयले, दत्तात्रय चव्हाण हे सदस्य उपस्थित होते. सरपंच पदासाठी मनिषा मोरे व मनिषा कोयले यानी तर उपसरपंच पदासाठी उमेश गायकवाड व दत्तात्रय चव्हाण यानी अर्ज दाखल केले होते.
यावेळी गुप्त पध्दतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सरपंच पदासाठी मनिषा मोरे यांना चार तर मनिषा कोयले यांना तीन तर उपसरपंच पदासाठी उमेश गायकवाड यांना चार तर दत्तात्रय चव्हाण यांना तीन मते मिळाल्याने सरपंद पदी मनिषा मोरे यांची एका मताने तर उपसरपंच पदासाठी उमेश गायकवाड यांची एका मताने निवड झाल्याचे जाहिर केले.
यावेळी तलाठी श्री.गवळी, ग्रामसेवक श्री. गिड्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.