उजनीतून सोडला जाणारा विसर्ग कमी केला

विरचा पूर्णपणे बंद : धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पुणे जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली असून उजनी धरणात येणारा विसर्गही 9 हजार क्यूसेक्स पर्यँत कमी झाला आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केवळ 498 एवढा आहे. बुधवारी सायंकाळी 5 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडन्यास सुरुवात केली होती मात्र गुरुवारी सकाळी यामध्ये कपात करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील सर्व धरणावर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. गुरुवारी सकाळी दौंड येथे 8 हजार 469 क्यूसेक्स एवढा तर बंडगार्डन येथे हाच विसर्ग 9 हजार 50 क्यूसेक्स एवढा आहे.

या पार्श्वभूमीवर सकाळी उजनीतून सोडण्यात येणारा विसर्ग कमी केला आहे. त्याचबरोबर वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी सुद्धा बंद करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!