राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा ईशारा

या जिल्ह्यात दोन दिवसांत पाऊस पडणार

टीम : ईगल आय मीडिया

राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात २८ आणि २९ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ऐन हिवाळ्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

या जिल्ह्यात पावसाची शक्यता

जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांत २९ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच, या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

आज २६ डिसेंबरपासून वायव्य भारतावर व २७ डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी काही जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात २८ आणि २९ डिसेंबरला पावसाची शक्यता असल्याचं भाकित करण्यात आलं आहे. त्यानुसार हवामान विभागानं मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!