बैल धुण्यासाठी गेले आणि काका पुतण्या बुडून मयत झाले

टीम : ईगल आय न्यूज

पोळा सणानिमित्त लाडक्या बैलांना तलावावर धुण्यासाठी घेऊन गेलेले काका आणि पुतण्या तलावात बुडून मयत झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव मेटे ( ता. फुलंब्री, जि.औरंगाबाद ) येथे घडली आहे. पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३ ) व रितेश अजिनाथ काळे (वय १८ ) अशी या मृत्यू पावलेल्या काका पुतण्याची नावे आहेत..

पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल धुण्यासाठी पंढरीनाथ काळे हे आपल्या रितेश आणि पवन या दोन पुतण्यांसह शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले असता, अचानक बैल धुताना पंढरीनाथ यांना बैलाने जोरात झटका दिला आणि ते तलावात पडले.

काका तलावात पडलेले पाहून पुतण्या रितेश याने काकांना वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. परंतु यात काका आणि पुतण्याला बाहेर न निघता आल्यामुळे दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.. पोळ्याच्या दिवशीच ही घटना घडली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

error: Content is protected !!