उपरी परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसला

वनविभागाच्या पथकाने केली पाहणी

पंढरपूर  : ईगल आय मीडिया

उपरी ( ता. पंढरपूर ) गावच्या हद्दीत उजनी उजवा कालव्याच्या पळशी बोगद्याच्या जवळ आज संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास  बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आला. ही बातमी समजताच उपरी पळशी, गादेगाव ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. मागील महिन्यात भांडीशेगाव, वाखरी परिसरात अशाच प्राण्याने तीन जनावरे ठार केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून घबराट पसरली आहे. 

उपरी येथील संतोष नागणे या युवा शेतकऱ्यांचा जेसीबी चालू होता. त्यावेळी उपरी, गाडेगाव, पळशी च्या सीमेलगत   बोगद्या जवळ आज सोमवारी (ता.८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास  बिबट्या सदृश्य प्राणी दिसून आला.  या प्राण्याचा vdo काढण्यात आला आहे। 

दरम्यान, या बाबत वनविभागाच्या आधिकाऱ्यांशी देखील संपर्क करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर उद्या ( मंगळवारी ) सकाळी पुन्हा पाहणी साठी येणार असल्याचे सांगितले.  या बाबतचा व्हिडिओ देखील वनविगाच्या आधिकाऱ्यां पर्यंत पोहचविण्यात आला आहे. 

रात्री अंधारात पळशी गावातील व उपरी गावातील तरुणांना एकत्र आणून मारुती जाधव, उपरी चे सरपंच ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बिबीशन जाधव, गणेश जाधव, समाधान जाधव, अमोल नागणे, संतोष नागणे, अनिल जाधव, सौरभ बागल यांच्यासह उजनी कॅनॉल चा परिसरातील शेतकऱ्यांना सावध करून सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!