सोशल डीस्टशिंगचे होणार काटेकोर पालन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
उपरी ( ता .पंढरपूर ) येथील गायरान जागेत असलेल्या दलित समाजाच्या स्मशान भूमिस अतिक्रमण झाल्याने अडथळा येत असून हे अतिक्रमण काढण्याच्या मागणी साठी रिपाईच्या वतीने 4 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे रिपाई चे प्रदेश संघटक दीपक चंदनशिवे यांनी जाहीर केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील दलितवस्ती स्मशानभूमी जवळ असलेल्या गायरान जमीनवर गावातील समाजकंटक यांनी अतिक्रमण केल्यामुळे दलित समाजाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वेळोवेळी शासनाकडे लेखी निवेदन देऊनही याबाबत विचार होत नाही. त्यामुळे हे आर पी आय (आठवले गट )च्या वतीने नेते दीपक चंदन शिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.
उपरी येथील गट नंबर 447 मधील दोन हेकटर 72आर शेतजमीन दलित समाजाची स्मशानभूमीची आहे. या जमीनमध्ये अतिक्रमण झाले आहे. ते काढुन घेण्यासाठी येत्या 4आगस्ट रोजी हे अमरण उपोषण होणार आहे.
याबाबत 28जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.या उपोषणास अनिल सोनवणे, दत्ता वाघमारे, आदी बसणार आहेत.