Upsc परीक्षेत पंढरपूरकरांचा डबल धमाका !

खर्डीचे राहुल चव्हाण, कासेगावचे अभयसिंह देशमुख यांचे यश

पंढरपूर : ईगल आय मीडिया
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पंढरपूरकरांनी डबल धमाका उडवला असून खर्डीचे राहुल चव्हाण ( ias ) आणि कासेगावचे अभयसिंह देशमुख यांनी आय पी एस पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे.

खर्डी ( ता . पंढरपूर येथील ) राहुल लक्ष्मण चव्हाण यांनी आय ए एस परीक्षेत 109 वी रँक मिळवली आहे.
शेतकरी कुटुंबातील राहुल चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण खर्डी, माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशाला आणि महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले आहे. राहुल चव्हाण यांनी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे.
मंगळवारी आय ए एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामध्ये राहुल चव्हाण यांनी 109 वी रँक मिळवली आहे.
तर कासेगाव येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी 151 वी रँक मिळवून आय. पी. एस. परीक्षेत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अभयसिंह देशमुख यांनी यापूर्वी एकवेळ upsc परीक्षेत यश मिळवले आहे.
एकाच दिवशी दोन युवकांनी देशपातळीवरील परीक्षेत डंका वाजवल्याने राहुल चव्हाण आणि अभयसिंह देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!