इयत्ता 5 वी आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

9 ऐवजी 12 ऑगस्ट रोजी होणार परीक्षा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

येत्या 9 ऑगस्ट रोजी होणारी इयत्ता 5 वी आणि 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. 9 ऑगस्ट ऐवजी आता या परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होतील असेही दराडे यांनी सांगितले आहे.

राज्यातील इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षा येत्या 9 ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र काही जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, महापूर, दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना, त्याचा रस्ते वाहतुकीवर झालेला परिणाम आणि दळणवळणातील अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 9 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलून 12 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

या परीक्षेसाठी यापूर्वी देण्यात आलेले हॉल प्रवेशपत्र ग्राह्य धरण्यात येईल असेही परिषदेच्या वतीने कळवण्यात आले आहे. त्यामुळे येत्या 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षा आता 12 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!