वडवळ येथे अमावस्येनिमित्त झाली गर्दी

मोहोळ पोलिसात मंदिर समिती व दुकानदारांसह ३९ जणांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल

मोहोळ : ईगल आय मीडिया

वडवळ ( ता.मोहोळ ) येथील नागनाथ मंदिर येथे आज ( दि.8 रोजी ) अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मोहोळ पोलिसांनी मंदिर समितीच्या सदस्यांसह दुकानदारांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

कोरोनामुळे सध्या राज्यातील सर्वच मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र आज अमावस्या असल्याने वडवळ येथील नागनाथ मंदिर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले ठेवले आहे. त्यामुळे दर अमावस्या व सोमवारच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत.

मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ मंदिर याला अपवाद असून दर अमावस्येला भक्त शेकडोच्या संख्येने गर्दी करत आहेत. मंदिर समितीच्या या भूमिकेबद्दल तालुका प्रशासन सोयीस्करपणे डोळेझाक करत आहे. श्रावण महिन्यात पूर्ण महिनाभर मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलून मंदिर समितीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.


आतापर्यंत वडवळ गावामध्ये जवळपास २५ ते ३० गावकऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १०० हुन अधिक लोक संक्रमीत झाले आहेत. यामध्ये मंदिराचे मुख्य पुजारी महादेव शिवपूजे व त्यांच्या मातोश्री यांचेही निधन झाले आहे. तरीही आमावस्याला येणारे लोक पैसे देतात, पावत्या फाडतात म्हणून लालसेपोटी मंदिर खुले ठेवण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, मोहोळ पोलिस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेत मंदिर समितीला मंदिर बंद करण्यास भाग पाडले. तसेच वडवळ कडे येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना वडवळ गावच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून नागनाथ मंदिर समितीच्या १३ जणांवर तर बेकायदेशीर दुकाने सुरू ठेवणाऱ्या २६ अशा एकुण ३९ जणांवर भादंवि १८८, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.


वडवळ नागनाथ मंदिराचे पुजारी, मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना कोविड १९ चे नियम यापूर्वीच समजावून सांगितले आहेत. तशी नोटीस देखील त्यांना देण्यात आली आहे. तरीदेखील मंदिर समितीने अमावस्ये निमित्त मंदिर खुले ठेवल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर समिती, पुजारी व मंदिर परिसरातील दुकानदारांवर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सायकर
पोलिस निरीक्षक मोहोळ

श्रीकांत महादेव शिवपुजे, शाहीर श्रीहरी पवार, भाऊसाहेब यशवंतराव देशमुख, नागनाथ भोजा शिवपुजे, संतोष विश्वनाथ शिवपुजे, गणेश मारूती मोरे, चंद्रकांत आप्पा शिवपुजे, महेश रेवण कोटीवाले, सुभाष नागनाथ शिवपुजे, धनाजी नामदेव पवार, बाळासाहेब बाबाजी शिवपुजे, रघुनाथ कृष्णाजी मोकाशी व मंदिर पुजारी सागर नागनाथ शिवपुजे (सर्व रा. वडवळ, ता. मोहोळ), या मंदिर समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.

तर रवी पोपट शिवपुजे, राजकुमार तुकाराम मोरे, ऋषिकेश आण्णासो मोरे, शिवाजी सदाशिव शिवपुजे, शहाजी तुकाराम मोरे, अमोल देविदास लेंगरे, नागेश महादेव शिवपुजे, कल्याण जालींदर मोरे, ताराबाई लक्ष्मण बाबर, पुष्पा राजेंद्र मराडे, लखन देविदास लेंगरे, महमद ताबोळी, देविदास मारुती लेंगरे, लक्ष्मण निवृत्ती बाबर, राणी सोमनाथ शिवपुजे, नितीन लक्ष्मण शिवपुजे, हणमंत श्रीरंग मोरे, बाळासाहेब मनोहर लेंगरे, पृथ्वीराज चंद्रकांत शिवपुजे, दत्तात्र यशवंत मधवे, नागेश दगडू कोळी, गणेश दगडू कोळी, धनाजी भागवत नरके, संतोष अशोक नरळे (सर्व रा. वडवळ, ता. मोहोळ) या दुकानदारावर झाले गुन्हे दाखल झाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!