सिंहगड अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश
पंढरपूर : ईगल आय न्यूज
खळवे (ता.माळशिरस) येथील वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर साहाय्यक पदावर निवड झाली असल्याची माहिती सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
वैभव ननवरे यांचे शिक्षण पंढरपूर येथे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात झालेले आहे. एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा, गट ब महसूल सहायक, विक्रीकर सहाय्यक पदाची परीक्षा ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धा परीक्षेचा निकाल जुलै २०२३ मध्ये जाहिर झाला. या परीक्षेत वैभव दत्तात्रय ननवरे यांची मंञालयात महसुल साहाय्यक आणि विक्रीकर विभागात कर साहाय्यक पदावर निवड झाली आहे.
स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.