वाखरी, देवडे गावात कोरोनाचा कहर

एकाच दिवसात आले धक्कादायक पॉझिटिव्ह अहवाल

पंढरपूर ; ईगल आय मीडिया

पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केलेला असला तरी वाखरी आणि देवडे गावातील रॅपिड अँटीजन टेस्ट नंतर धक्कादायक संख्येने कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. शेकडोंच्या संख्येने रुग्ण वाढू लागल्याने ग्रामीण भागातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव उशिरा आणि मर्यादित स्वरूपात झाला होता. मात्र गेल्या 8 ते 15 दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. बघता बघता पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 1600 पेक्षा अधिक झाली आहे.
प्रशासनाने रॅपिड अँटीजन टेस्टची संख्या आता वाढवली आहे. त्यामुळे गावागावात शेकडो rat होऊ लागल्या आहेत.

वाखरी गावात गुरुवारी 110 लोकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट घेतल्या त्यापैकी तब्बल 38 लोक पॉझिटिव्ह आले आहेत. गोसावी वस्ती परिसरातील तीन कुटुंबातील रुग्णांची संख्या यामध्ये सर्वाधिक आहे.

वाखरीत यापूर्वी एकाच दिवशी 16 लोक पॉझिटिव्ह आले होते आणि आता गावातील रुग्ण संख्या 75 पेक्षा जास्त झाली आहे.
तर देवडे या कमी लोकसंख्या असलेल्या गावातही गुरुवारी तब्बल 29 लोकांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गावात आणि भीमा नदी पलीकडे खळबळ उडाली आहे.

आजवर एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह तपासणी अहवाल भाळवणी, करकम्ब, कासेगाव अशा मोठया गावातही आले नाहीत मात्र आता छोट्याशा गावातही मोठ्या संख्येने रुग्ण सापडू लागल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!