वाखरीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड

निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला

पंढरपूर : eagle eye news

वाखरी ( ता. पंढरपूर ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रकांत चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, गुलाल उधळून गावातून नूतन उपसरपंच चव्हाण यांची मिरवणूक काढण्यात आली.

वाखरी गावचे उपसरपंच संजय लेंगरे यांनी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ठरल्यानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी गुरुवारी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत सभागृहात बोलावण्यात आली होती. यावेळी सरपंच धनश्री साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड करण्यात आलेली आहे.माजी उपसरपंच सोमनाथ पोरे यांनी चंद्रकांत चव्हाण यांच्या नावाची सूचना केली, त्यावर सर्व सदस्यांनी अनुमती देत बिनविरोध निवड केली.


निवडीनंतर सरपंच साळुंखे यांच्या हस्ते नूतन उपसरपंच चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी सावता शिंदे, माजी सरपंच कविता पोरे, सदस्य संग्राम गायकवाड, संजय लेंगरे, विक्रम घॊडके, महेश लोखंडे, सौ उमाबाई जगताप, सौ दिपाली पिसे, सौ वर्षा पवार,सौ वैशाली पांढरे, सौ वैशाली काळे, सौ ज्ञानेश्वरी सलगर, श्रीमती छायादेवी लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य निखिलगिर गोसावी, पंतकृपा पतसंस्थेचे चेअरमन गुलाब पोरे, सहकार शिरोमणीचे माजी संचालक ईब्राहीम मुजावर, माजी उपसरपंच जोतिराम पोरे, सोसा.चे माजी चेअरमन कृष्णदेव चव्हाण, तुकाराम पोरे, माजी उपसरपंच सुभाष सुरवसे, लक्ष्मण गायकवाड, मधुकर पोरे, संजय सलगर, सुभाष शिंदे आदी आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र पोरे, रोहित गायकवाड उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!