वाखरी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

पंढरपूर : ईगल आय मीडिया

तालुक्यातील महत्वाची असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिले आहे. आज पंढरपूर येथे फेर आरक्षण सोडत काढण्यात आले, यावेळी वाखरी चे आरक्षण सर्व साधारण महिले साठी चिठी द्वारे निघाले आहे.

2015 साली obc महिलेसाठी वाखरीचे सरपंच पद आरक्षित झाल्यामुळे 2020 ते 2025 या काळासाठी सरपंचपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाले आहे. यापूर्वी 27 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या सरपंच आरक्षण सोडतीवेळी गावचे आरक्षण सर्वसाधारण साठी खुले राहिले होते.

मात्र आजच्या फेर अरक्षन सोडतीवेळी आरक्षण बदल झाला आहे. चिट्ठी काढल्यानंतर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाली.

Leave a Reply

error: Content is protected !!