आणखी आठ दिवस वाट पाहू

लोकभावनेचा सरकारने आदर केला : डॉ. आंबेडकर

पंढरपूर : ईगल आय मीडिया

या लोकभावनेचा आदर करत शासनाने माझेसह मोजक्या लोकांना विठ्ठलाच्या मुख दर्शनाला परवानगी दिली. यामुळे मुख्यमंञ्याचा मी आभारी आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. शासन एस ओ पी नियुक्त करणार असुन याच्या अहवालानंतर मंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. यासाठी आम्ही आठ दिवस अहवालाची वाट पाहू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

विठ्ठल दर्शनानंतर मंदिराबाहेर आंबेडकर पञकारांशी बोलत होते. आजच्या आंदोलकाकडे राज्यातील भाविकांचे लक्ष लागले होते. अखेर हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सागर कवडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनिल जोशी यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. शासनाचे प्रतिनिधि म्हणून आंदोलकांशी चर्चा केली.

अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ. सागर कवडे पो. नि. अरुण पवार हे शिवाजी चौक, मंदिर परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून होते. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराद्वारे प्रत्येक प्रसंगाचे चित्रीकरण करीत होते.

Leave a Reply

error: Content is protected !!