एस टी बस सेवा 36 तास बंद
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले करावे, या मागणीसाठी विश्व वारकरी सेना, बहुजन वंचित आघाडीकडून उद्या ( दि.३१ आॅगस्ट रोजी ) होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव एसटी बस सेवा बंद ठेवण्यात येत आहे. तसेच 400 पोलीस बंदोबस्त करण्यासाठी तैनात केले आहेत.
पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांसाठी योग्य त्या नियम, अटी अधीन खुले करावे, वारकऱ्यांना भजन, कीर्तनास परवानगी द्यावी. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी किमान एक लाख वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे जाहीर आवाहन केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनास पाठिंबा देत कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पंढरपुरात येण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
आंदोलना दरम्यान
एसटी बसची तोडफोड होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३० आॅगस्ट दुपारी १२ वाजल्यापासून ते ३१ आॅगस्ट रोजी रात्री बारा वाजेपर्यंत सर्व एसटी बस बंद ठेवाव्यात, अशी मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली होती. त्यानुसार सर्व एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत. तसेच 400 पोलीस कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी तैनात केले आहेत.