गुंजवणी 96 टक्के : उजनी ची पाणी पातळी 40 टक्केच्या उंबरठ्यावर
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शनिवारी सकाळी 8.30 वाजता नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग पुन्हा वाढला असून 32 हजार 368 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पुणे बंडगार्डन येथे 22 हजार 77 क्यूसेक्स ने पाणी येत आहे. भीमा खोऱ्यातील खडकवासला, पवना, कासारसाई ही मोठी धरण 100 टक्के भरल्याने बंडगार्डन येथे येणारा विसर्ग वाढवला आहे. सकाळी 8 वाजता उजनीच्या पाणी साठ्यात 37.16 टक्के एवढी वाढ झाली आहे. उजनीच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत असून शेतकरी आनंदित झाला आहे.
निरेच्या खोऱ्यातील गुंजवणी धरण 96 टक्के भरले असून गुंजवणी धरणातून 2 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले जात आहे. वीर 96 टक्के तर भाटघर 84 टक्के, नीरा देवघर 71 टक्के भेटले आहेत. सर्व चारही धरणे सध्या भरण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे वीर धरणामधून नीरा नदीत शनिवारी सकाळी साडे आठ वाजता विरमधील विसर्ग 32 हजार 368 क्यूसेक्स एवढा करवण्यात आला आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात आणखी बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भीमेच्या खोऱ्यातील खडकवासला सह इतर 2 धरणे 100 टक्के भरली आहेत.त्यामुळे उजनीत येणारा पाण्याचा प्रवाह कायम आहे.त्याचा लाभ होऊन धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे.