वीरचा विसर्ग 23 हजार क्यूसेक्स !

नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजता वीर धरणातून नीरा नदीत सोडणारा पाण्याचा विसर्ग 23 हजार 120 क्यूसेक्स पर्यंत वाढवण्यात आला आहे.त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वीर धरण प्रशासनाकडून देण्यात आली.

like, and subscribe to channel

गुरुवारी सकाळी 6 वाजता वीर धरणात 99.27 टक्के, भाटघर धरणात 73.72 टक्के, नीरा देवघर धरणात 61.45 टक्के, तर गुंजवणी 90.3 टक्के एवढा पाणी साठा झाला आहे.नीरा खोऱ्यातील चार धरणातील सरासरी 37.19 tmc पाणी साठा झाला आहे.

मंगळवारी वीर धरणावर असलेल्या वीज निर्मिती प्रकल्पातून नीरा नदीला 800 क्यूसेक्स ने पाणी सोडले होते. त्यानंतर बुधवार पासून धरणाच्या गेट मधून नीरा नदीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता विरमधील विसर्ग 6 हजार 900 क्यूसेक्स एवढा वाढवण्यात आला आहे. तर दुपारी सव्वा एक वाजता त्यात वाढ करून विसर्ग 13 हजारांवर वाढवला गेला. तर सायंकाळी 4.45 वाजता 3 दरवाजातून हा विसर्ग 23 हजार 120 क्यूसेक्स पर्यंत वाढवण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!