निरे काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
बुधवारी सायंकाळी 4 वाजता नीरा नदीत वीर धरणातून 1250 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत असून तर रात्री सव्वा आठ वाजता विसर्ग वाढवून 4650 क्यूसेक्स करण्यात आला आहे. तसेच नदी काठच्या गावांमध्ये लोकांनी काळजी घ्यावी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वीजनिर्मिती प्रकल्पातूनही 800 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती वीर धरण प्रशासनाकडून देण्यात आली.
नीरा नदीच्या खोऱ्यात यंदा पाऊस कमी असल्याने नीरा नदीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही. मंगळवारी वीर धरणावर असलेल्या वीज निर्मिती प्रकल्पातून नीरा नदीला 800 क्यूसेक्स ने पाणी सोडले होते. त्यानंतर बुधवार सायंकाळी वीर धरणाचे गेट नं 5 हे 1 फुट उचलून धरणातून 1250 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू केला आहे, अशी माहिती नीरा उजवा कालवा विभागकडून देण्यात आली.
दि 12/08/2020 रा8.15वाजता
वीर धरण
सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800
क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्गमधे वाढ करुन तो 4650 रा 8.30 वजता करण्यात येणार आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा.
यंदा वीर,भाटघर, नीरा देवघर धरणे संथगतीने भरत आहेत. मंगळवारी सकाळी वीर धरण 98 टक्के तर भाटघर धरण 70 टक्के भरले आहे. तुरळक प्रमाणात पाऊस सुरू असून वीर धरण 100 टक्केच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे मंगळवारी दु. 4 वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 800
क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू करण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात प्रथमच धरणातून नीरा नदीला दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे.