नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता वीर धरणातून नीरा नदीत सोडणारा।पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यात दुपारी सव्वा एक वाजता वाढ करून 13 हजार 950 क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती वीर धरण प्रशासनाकडून देण्यात आली. नीरा नदीच्या खोऱ्यात यंदा पाऊस कमी असल्याने नीरा नदीला पाणी सोडण्याची वेळ आली नाही.
गुरुवारी सकाळी 6 वाजता वीर धरणात 99.27 टक्के, भाटघर धरणात 73.72 टक्के, नीरा देवघर धरणात 61.45 टक्के, तर गुंजवणी 90.3 टक्के एवढा पाणी साठा झाला आहे.नीरा खोऱ्यातील चार धरणातील सरासरी 37.19 tmc पाणी साठा झाला आहे.
मंगळवारी वीर धरणावर असलेल्या वीज निर्मिती प्रकल्पातून नीरा नदीला 800 क्यूसेक्स ने पाणी सोडले होते. त्यानंतर बुधवार सायंकाळी वीर धरणाचे गेट नं 5 हे 1 फुट उचलून धरणातून 1250 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू केला आहे. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजता विरमधील विसर्ग 13 हजार 950 क्यूसेक्स एवढा वाढवण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच धरणातून नीरा नदीला दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे.