वीरचा विसर्ग 40 हजार क्यूसेक्स वर


निरेच्या काठावर नागरिकांना इशारा

व्हीडिओ पहा, चॅनेल subscribe करा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शनिवारी सायंकाळी 5 वाजता नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग पुन्हा वाढला असून 40 हजार 462 क्यूसेक्स करण्यात इतका आला आहे. सर्व 9 दरवाजे 4 फुटांनी उचलून पाणी सोडले आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच वीर मधून 40हजार क्यूसेक्स चा विसर्ग करण्यात आला आहे.

निरेच्या खोऱ्यातील गुंजवणी धरण 96 टक्के भरले असून गुंजवणी धरणातून 2 हजार क्यूसेक्स ने पाणी सोडले जात आहे. वीर 96 टक्के तर भाटघर 84 टक्के, नीरा देवघर 71 टक्के भरले आहेत. सर्व चारही धरणे सध्या भरण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे वीर धरणामधून नीरा नदीत शनिवारी सकाळी साडे आठ वाजता विरमधील विसर्ग 32 हजार 368 क्यूसेक्स एवढा करवण्यात आला होता.त्यात सायंकाळी 5 वाजता वाढ करण्यात आली असून 40 हजार करण्यात आली आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार नदीच्या विसर्ग सोडण्याच्या प्रमाणात आणखी बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी, नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!