वीर चा विसर्ग पूरस्थिती कडे

टीम : ईगल आय मीडिया

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून वीर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज पहाटे विर धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढवण्यात आला आहे. पहाटे 4-वाजता 32 हजार 459 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

वीर धरणाच्या सांडव्यातून काल दुपारी 12 वाजता 4 हजार तर सायंकाळी 5 वाजता 13 हजार 911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला होता. सायंकाळी 6 वाजता त्यात वाढ करून 23 हजार 185 क्यूसेक्स करण्यात आला होता. आज पहाटे 4 वाजता हा विसर्ग आणखी वाढवून 32 हजार 459 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वीर धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वीर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नीरा नदी पात्रामध्ये ३२४५९ क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नीरा व भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे. तसेच वीर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असेही तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.


तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे. नीरा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!