भिमेला पूरस्थिती येणार : नीरा नदीच्या विसर्ग ३२ हजार क्यू.

वीर धरणातून नीरेला विसर्ग वाढला : उजनीचा विसर्ग ५ हजार केला

पंढरपूर : ईगल आय न्यूज

नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर धरणातील विसर्ग वाढवला आहे. त्याच बरोबर वीर च्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सोमवारी रात्री नऊ वाजता ३२ हजार क्यूसे इतका वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे भीमा नदीला पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे.

दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीला ५ हजार क्युसेकचा विसर्ग केला आहे. वीजनिर्मितीचा १६०० आणि वाढीव ५००० असा एकूण ६६०० क्यू. तर वीर आणि उजणीचा विसर्ग अधिक पंढरपूर तालुक्यात पावसामुळे भिमेला येणाऱ्या पाण्याचा विचार करता भीमा दुथडी वाहणार आहे.

नीरा नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.तसेच भाटघर धरणातून विसर्ग सुरू केला असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाऊस वाढला असून पाण्याची जादा आवक होत आहे.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे यापूर्वी १५० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसाच ठेवून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे निरा नदीमध्ये २३,३३५क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात आला होता तर रात्री नऊ वाजता त्यात वाढ करून तो ३२ हजार क्यू इतका करण्यात आलेला आहे.

पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!