पंढरपूर : ईगल आय न्यूज
शनिवार ( दि. २४ ऑगस्ट ) रोजी वीर धरण १०० टक्के भरलेले असून पाणी पातळी मध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच भाटघर व निरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे. त्यामुळे वीर धरणाच्या सांडव्याद्वारे १३९११ क्यसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल.याद्वारे विनंती करण्यात येते कि,नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी.
– शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता,नीरा उजवा कालवा विभाग,फलटण
वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१५ वाजता निरा नदीमध्ये वीर धरणाच्या निरा डाव्या कालव्याच्या अतीवाहका द्वारे ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. निरा उजव्या कालव्याच्या अतीवाहकाद्वारे १००० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे १३९११ क्यसेक्स एवढा विसर्ग सुरू करण्यात येत आहे.आता निरा नदीमध्ये काहीकाळ एकूण विसर्ग १५२११क्युसेक्स असणार आहे.