वीर 100 टक्के : विसर्ग 13 हजार क्यूसेक्स वर

नीरा खोऱ्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली

टीम : ईगल आय मीडिया

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत असून वीर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज सायंकाळी विर धरणातून नीरा नदीला पाणी सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून 13 हजार911 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

संबंधित बातमी वाचा !

दरम्यान आज सकाळी 8 वाजता भीमा नदीच्या खोऱ्यातील 9 धरणांतून 14 हजार 545 क्यूसेक्स चा विसर्ग सुरू झालेला आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज दुपारी 5 वाजता 13 हजार 911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

भाटघर:-100 टक्के भरले आहे. धरणातून 8624 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.
निरादेवघर:-100% भरले आहे आणि धरणातून 5110 क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.
गुंजवणी:-100 टक्के भरले आहे तर 998 क्यूसेक्स विसर्ग सुरू केला आहे.
वीर 100% भरले असून सायंकाळी 5 वाजता 13 हजार 911 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
निरा डावा कालवा 827 क्यूसेक्स,
निरा उजवा कालवा 599 क्यूसेक्स,
वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करून संध्याकाळी 5.00 वाजता 13911 Cusecs विसर्ग सुरू करण्यात आला आहे.


तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन नीरा उजवा कालवा विभागाने केले आहे. नीरा नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये अशा प्रकारे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!