आ. समाधान अवताडे यांची मागणी : कृष्ण खोरे विकास महामंडळास पत्र
पंढरपूर : eagle eye news
सद्या वीर धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे, हे पाणी नदीद्वारे वाहून जात आहे. हे पाणी निरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाक्षत्रेक्षात मिळवून द्यावे. यामुळे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील, तिसंगी तलाव, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत, त्यामुळे शेतकर्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, तसेच भुजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे,अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या मागणीची दखल घेत पाणी सोडण्यात येईल असे महामंडळाने कळवले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना आ. अवताडे म्हणाले कि, पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यामध्ये नीरा उजवा कालव्याद्वारे रांझणी, अनवली, एकलासपूर, तावशी, उंबरगाव, बोहाळी, कासेगाव, कोर्टी, टाकळी, वाखरी, इसबावी, खर्डी, त.शेटफळ, तनाळी, गादेगाव व तिसंगी मध्यम प्रकल्पास लाभ मिळतो. परंतु तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेतकर्यांनी वारंवार मागणी केली. मी स्वत: फोनद्वारे, पत्राद्वारे तसेच पाणी वाटप नियोजन बैठकी देखील अनेक वेळा पाणी देण्याबाबत मागणी केली आहे. परंतु,वीर धरणात पाणी कमी असल्याने व अधिकार्याच्या योग्य नियोजन अभावी शेतकर्यांना पुरेसे प्रमाणात पाणी मिळाले नाही. तसेच गादेगाव, वाखरी, कोर्टी, बोहाळी, टाकळी व उंबरगाव या सहा गावांना शेवटचे अवर्तन मिळाले नाही. यामुळे शेतकर्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या सहा गावांना प्राधान्याने पाणी मिळावे.
नीरा नदीतून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर भागाला दिले तर या लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम प्रकल्प, बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, पूर्ण क्षमतेने भरून घेता येतील. या भगातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. तरी या मागणीची दखल घेवून वीर धरणातून नीरा नदीतील वाहून जात असलेले पाणी नीरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्याला देण्याबाबत तात्काळ आदेश देण्यात यावेत. अशीहि मागणी आमदार समाधान आवताडे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले यांना केली आहे.