कोणत्याही क्षणी वीर मधून निरेला पाणी सोडले जाईल

निरेच्या खोऱ्यात अभूतपूर्व पाऊस : नीरा देवघर 75 तर वीर 68 टक्के भरले

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी अभूतपूर्व असा पाऊस झाला आहे, त्यामुळे दिवसभरात वीर धरणात सुमारे 20 टक्के पाणी वाढले तर नीरा देवघर धरणात ही 15 टक्के पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे आज दिवसभरात कधीही नीरा नदीला पाणी सोडले जाउ शकते,असा ईशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

संबंधित वृत्त वाचा !

नीरा नदीच्या खोऱ्यात नीरा देवघर,भाटघर आणि वीर , गुंजवणी ही धरणे आहेत. त्यापैकी गुंजवणी वगळता इतर तीन धरणे मोठ्या साठवण क्षमतेची आहेत. यंदाच्या पावसाळ्यात नीरा खोऱ्यात ही पावसाने ओढ दिली होती त्यामुळे ही धरणे संथगतीने भरत होती. मात्र गेल्या 3 दिवसांत या धरणांवर आणि घाटमाथ्यावर ढगफुटी झाल्याने अभूतपूर्व अशा पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे गुरुवारी 48 टक्के असलेले नीरा देवघर धरण आज सकाळी 75 टक्के वर गेले तर वीर धरण 49 टक्के वरून 68 टक्के वर गेले. भाटघर धरणात ही 35 टक्केवरून 46 टक्के एवढी 11 टक्केची वाढ झाली. 24 तासात ही वाढ झाल्याने वीर धरणातून कोणत्याही क्षणी नीरा नदीला पाणी सोडले जाईल असे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे.

तशा प्रकारच्या सूचना पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासनाला दिल्या आहेत. नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे, नदी पात्रात जाऊ नये अशा सूचना देण्यात येत आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!