विरचा विसर्ग पुन्हा वाढला : नीरा खोऱ्यातील 3 धरणे 100 टक्के

पाऊस सुरूच असल्याने नीरा काठी सतर्कतेचा ईशारा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

नीरा नदीच्या खोऱ्यात पावसाची संततधार सुरूच असून 5 पैकी 3 धरणे 100 टक्के तर 2 धरणे 95 टक्के भरली असल्याने वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा विसर्ग सकाळी 8 वाजता पुन्हा वाढवण्यात आला आहे. धरण प्रशासनाने नीरा काठी सतर्कतेचा ईशारा दिला आहे.

नीरा नदीच्या खोऱ्यात गेल्या 8 दिवसांपासून सातत्याने दमदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी गुंजवणी धरण क्षेत्रात 49 मिमी तर नीरा देवघर धरण क्षेत्रात 35 मिमी एवढा पाऊस झाला आहे. यंदाच्या हंगामात गुंजवणी धरणावर 1666 मिमी तर नीरा देवघर धरणावर 1553 मिमी एवढा पाऊस झालेला आहे. ही दोन्ही धरणे अनुक्रमे 96 टक्के आणि 93 टक्के भरली आहेत. तर भाटघर, वीर आणि नाझरे ही 3 धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे आता 5 ही धरणात येणारे पाणी साठवणे अशक्य झाल्याने दररोज सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत आहे. नीरा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा आढावा घेऊन दर दोन तासांनी पाणी सोडण्याचे प्रमाण कमी अधिक केले जात आहे. पाऊस वाढला तर नदीला सोडण्यात येणाऱ्या विसर्गाचेपाणी वाढवले जाऊ शकते. त्यामुळे नीरा नदीकाठी लोकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी 8 वाजता विरचा विसर्ग वाढवला

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये 800 Cusecs
विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे.वीर धरणातुन सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करुन सकाळी 8 वाजता 18 हजार 548 Cusecs विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!