विरार च्या हॉस्पिटलमध्ये आग : 12 रुग्णाचा मृत्यू

टीम : ईगल आय मीडिया

विरारमधील एका रुग्णालयातीबल अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीत 10 ते 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आज पहाटे 5 ते 5.30 च्या दरम्यान भीष आग लागली. यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते. यातील 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.तर 5 जणांना अन्यत्र हलवण्यात यश आले आहे.

वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ही आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी रवावा झाल्या आहेत.

तसेच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे. 

Leave a Reply

error: Content is protected !!