खेळीमेळीच्या वातावरणात भगीरथ भालके यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी युवा नेते भगीरथ भालके यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.
सर्व संचालक मंडळाने भगीरथ भालके यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. चेअरमनपदासाठी अर्ज दाखल करण्याचा वेळेत केवळ भगीरथ भालके यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस एम तांदळे यांनी जाहीर केले आहे.
कारखान्याचे संस्थापक औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून नूतन चेअरमन भगीरथ भालके यांनी कै. अण्णांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, भगीरथ भालके यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुष्पहार, बुके आणले होते मात्र त्यांनी एकही सत्कार स्वीकारला नाही.
निवडीनंतर कल्याणराव काळे यांच्या हस्ते भगीरथ भालके यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आम.भारत भालके यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी विठ्ठल परिवाराचे जेष्ठ नेते कल्याणराव काळे यांच्यासह संचालक युवराज पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, समाधान काळे, गणेश पाटील, मोहन कोळेकर, सूर्यकांत बागल, विजयसिंह देशमुख, व्यंकट भालके, परिवाराचे प्रमुख नेते, सर्व संचालक, कार्यकर्ते उपस्थित आहेत. सहाय्यक निबंधक तांदळे हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित आहेत.