शेतकऱ्यांची संपूर्ण एफ आर पी दिली जाईल : भगीरथ भालके
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सील केलेली सर्व 7 ही बँक खाती gst विभागाने शुक्रवारी खुली केली आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी दिली. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफ आर पी चे संपूर्ण पैसे लवकरच दिले जातील अशीही ग्वाही भगीरथ भालके यांनी दिली.
थकीत 15 कोटींपैकी नुकत्याच संपन्न झालेल्या गाळप हंगामात विठ्ठल ने साडे आठ कोटी रुपये gst भरलेली आहे. साडे पाच कोटी रुपये 2018 -2019 गाळप हंगामातील थकीत होते. सध्या कोणतीही थकबाकी नाही, ही बाब साखर आयुक्तांच्या निदर्शनास आनून दिल्यानंतर शुक्रवारी gst सह आयुक्तांनी ( दि. 13 रोजी ) विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व बँक खाती खुली केली आहेत. कारखान्याच्या सभासदांमध्ये काही मंडळी गैरसमज पसरवित आहेत. याचबरोबर सोशल मिडीयावर अफवा पसरवण्यात येत असुन विठ्ठलच्या सभासदांची सर्व ऊस बिले देण्यास कारखाना प्रशासन सक्षम आहे. लवकरच ऊस बिले वाटप सुरु करण्यात येणार असल्याचे भगीरथ भालके म्हणाले.
सन २०१९ – २०२० गाळप हंगामामध्ये कारखाना सुरु झाला नाही. यामुळे सन २०१८ – २०१९ ची जीएसटीची रक्कम थकबाकी राहिली होती. यावर्षीचा गाळप हंगाम सुरु करताना कै आ. भारत नाना भालके व संचालक मंडळानी वेळोवेळी पुणे येथील जीएसटी कार्यालयात जावून ५ कोटी ८२ लाख भरले आहेत. उर्वरीत रक्कम भरणेसाठी मुदत घेतली होती. यावर्षी गाळप हंगामातील सर्व जीएसटी रक्कम कारखान्याने भरली असुन मागील थकीत रक्कमेपैकी ८ कोटी ५० लाख भरले आहेत.
चेअरमन भगिरथ भालके व संचालक मंडळाने जीएसटी सह आयुक्त यांची भेट घेवुन थकित रक्कमेबाबतची तपशिलवार माहिती दिली. यामुळे शुक्रवारी सील केलेली सर्व बँक खाती सुरु करण्यात आली आहेत. कै. आ. भारत भालके यांच्या धोरणानुसार कारखान्याचे कामकाज संचालक मंडळ करीत आहे. मागील कोणतीही ऊसबिले थकीत नाहीत. यावर्षीच्या गाळप हंगामातील एफआरपी प्रमाणे ऊस बिलांचे लवकरच वाटप सुरु करणार असल्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी सांगितले.