३१ जुलै पर्यंत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोना महामारीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३१ जुलैपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंदच राहणार आहे. मंदिर समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या वरची माहिती देण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाचा रुग्ण संख्येमध्ये वाढ होत आहे. 17 मार्च पासून विठ्ठल मंदिर भाविकांसाठी दर्शनास बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून ३१ जुलैपर्यंत मंदिरे, चित्रपटगृहे ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील बंद ठेवण्यात येणार आहे.
मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी देवाचे नित्योपचार हे नियमितपणे सुरू आहेत. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!